Thursday, February 9, 2012

5) कै.नारायण शंकर पित्रे यांनी १९८९ साली श्री महाविष्णू याग केला होता,

|| श्री प्रयाग माधवाय नमः ||


श्री प्रयाग माधव उत्सव तिथी - माघ पौर्णिमा 


|| श्री प्रयाग माधवाय नमः ||


|| ॐ नमो भागवते वासुदेवाय ||


नमोस्त्वनंताय सहस्र मूर्तये सहस्र पादाक्षि शिरोरु बाहवे |
सहस्र नाम्ने पुरुषाय शाश्वते सहस्र कोटी युगधारिणे नमः |
-----------------------------
यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत 
अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम् ॥७॥
परित्राणाय साधूनां विनाशाय  दुष्कृताम् 
धर्मसंस्थापनार्थाय सम्भवामि युगे युगे ॥८॥
(श्रीमद्भगवद्गीता, अध्याय ४)
भावार्थः 
जब जब धर्म की हानि होने लगती है और अधर्म आगे बढ़ने लगता है
तब तब मैं स्वयं की सृष्टि करता हूं
अर्थात् जन्म लेता हूं  
सज्जनों की रक्षा एवं दुष्टों के विनाश और धर्म की पुनःस्थापना के लिए 
मैं विभिन्न युगों (कालोंमैं अवतरित होता हूं |

=====================================================================
माझें काका कै.नारायण शंकर पित्रे यांनी १९८९ साली कोरगाव,पेडणे,गोवा ह्या स्थानावर श्री महाविष्णू याग 
केला होतात्यावेळी जेवढ्या पित्रे मंडळीना बोलवायला जमले त्यांना श्री नारायण शंकर पित्रे यांनी चार दिवसांसाठी आमंत्रित केले होते त्या वेळचे काही फोटो.  


                    काही आरत्या 







निरोप आरती
जाहले भजन आम्ही नमितो तव चरण
वारुनिया विघ्ने देवा रक्षावे दीना ॥धृ॥
दास तुझे आम्ही देवा तुजलाची ध्यातो
प्रेमे करुनिया देवा गुण तुझेची गातो ॥१॥
तरी द्यावी सिद्धी देवा हेची वासना, देवा हेची वासना
रक्षुनियां सर्वां द्यावी आम्हासी आज्ञा ॥२॥
मागणे तेची देवा आता एकची आहे आता एकची आहे
तारुनियां सकळां आम्हां कृपादृष्टी पाहे ॥३॥
जेव्हां सर्व आम्ही मिळूं ऐशा या ठाया ऐशा या ठाया
प्रेमानंदे लागू तुझी कीर्ति गावया ॥४॥
सदा ऐशी भक्ति राहो आमुच्या मनी देवा आमुच्या मनी
हेची देवा तुम्हा असे नित्य विनवणी ॥५॥
वारुनिया संकटॆ आता आमुची सारी आता आमुची सारी
कृपेची साऊली देवा दीनावरि करी ॥६॥
निरंतर आमुची चिंता तुम्हां असावी चिंता तुम्हा असावी
आम्हां सर्वांची लज्जा देवा तुम्ही रक्षावी ॥७॥
निरोप घेता आता आम्हा आज्ञा असावी देवा आज्ञा असावी
चुकले आमचे काही त्याची क्षमा असावी ॥८॥

सर्व पित्रे मंडळीना ह्या ब्लोगवर आवश्यक माहिती उपलब्ध झाली असेल अशी अपेक्षा करतो, 
ब्लोगवरील सर्व माहिती हीच फक्त योग्य आणि खरी आहे असा माझां दावा नाही.काही गोष्टी आक्षेपार्ह वाटल्या 
तर आणि कोणाला काही बदल सुचवायचा असेल तर कृपया खाली दिलेल्या इमेल आयडीवर संपर्क करावा, 
हा ब्लोग बनविण्यामागे माझां कोणताही आर्थिक उद्देश नाही, तसेच देवस्थानशी संबंधित कोणत्याही आर्थिक 
व्यवहारासाठी मला संपर्क करू नये , हा ब्लोग हा माझां वैयक्तिक स्वरूपाचा आहे देवस्थानतर्फे नाही.
ह्याची सर्वांनी कृपया नोंद घ्यावी . चूक भूल माफी असावी. धन्यवाद.
सुरेश रघुनाथ पित्रे , ठाणे 
श्री कुलदेवता, श्री कुलदेवी आणि अन्य देवतांची उपासना करण्यासाठी विविध स्तोत्रे उपयोगी असतात ,
देवनागरी लिपीमधे श्री गणेश,देवी,विष्णू,कृष्ण,राम , शंकर,हनुमान तसेच अन्य
देवतांची विविध स्तोत्रे जी काही कठीणहि आहेत, पण काही रसाळ उत्तम चालीत 
म्हणता येतील अशी आहेत ती सर्व एकाच ठिकाणी तुम्हाला उपलब्ध होतील खाली दिलेल्या संकेत स्थळावर.
SURESH RAGHUNATH PITRE,THANE 

No comments:

Post a Comment